South Indian Dosa Chef
महत्त्वाची सूचना (कृपया ऑर्डर करण्यापूर्वी वाचा)
आजच्या हॉस्पिटॅलिटी मार्केटमध्ये चांगले आणि अनुभवी कर्मचारी मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. अनेक कर्मचारी ₹25,000/- ते ₹30,000/- किंवा त्यापेक्षा जास्त पगार, तसेच राहण्यासाठी Bunker Bed, TV, Wi-Fi, गरम पाणी (Water Heater) आणि चांगली राहण्याची सोय असलेल्या ठिकाणीच जॉईन करण्यास प्राधान्य देतात. कर्मचारी टिकवण्यासाठी योग्य सुविधा आणि स्पर्धात्मक पगार देणे आवश्यक झाले आहे.
आमची जबाबदारी: आम्ही तुमच्या आउटलेटपर्यंत कर्मचारी पोहोचवतो. कर्मचारी आउटलेटवर पोहोचून सेल्फी पाठवल्यानंतर आमची सेवा पूर्ण झालेली समजली जाईल.
जर कर्मचारी जॉईन झाला नाही तर: कर्मचाऱ्याला जॉईन करणे, टिकवणे आणि समाधानकारक कामाचे वातावरण देणे ही पूर्णपणे आउटलेट मालकाची जबाबदारी आहे. कमी पगार किंवा अपुरी राहण्याची सुविधा असल्यास कर्मचारी जॉईन न करण्याची किंवा काही दिवसांत काम सोडण्याची शक्यता असते.
₹600/- सेवा शुल्क परत मिळणार नाही. कारण आमची भरती सेवा आणि कर्मचारी आउटलेटपर्यंत पोहोचवण्याचे काम पूर्ण झालेले असते. त्यामुळे कर्मचारी जॉईन न केल्यास किंवा नंतर काम सोडल्यास ₹600/- सेवा शुल्क नॉन-रिफंडेबल राहील.